हडी येथे कालावल खाडी पात्राच्या किनारी वाळू उपशासाठी उभारलेले दोन दगडी रॅम्प प्रशासनाने उध्वस्त करीत कारवाई

0

मालवण,दि.१६ जानेवारी
मालवण तालुक्यातील हडी येथे कालावल खाडी पात्राच्या किनारी वाळू उपशासाठी उभारलेले दोन दगडी रॅम्प आज प्रशासनाने उध्वस्त करीत कारवाई केली. तर बंदर विभागाने नोंदणी नसलेल्या तेरई खाडी किनाऱ्यावरील नऊ होड्या आणि कालावल खाडी किनाऱ्यावरील १६ होड्याना नोटिसा बजावून नोंदणी करावी असे नमूद केले आहे बंदर विभागातर्फे प्रादेशिक बंदर अधीकारी कॅप्टन संदीप भुजबळ, बंदर अधिकारी अनंत गोसावी, आचरे मंडळ अधिकारी अजय परब, चिंदरचे तलाठी श्री. शेजवळ, आणि बंदर विभाग अधिकारी यांच्याकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली.