देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची पोलीस स्थानकातून उचलबांगडी

0

नागरिकांमधून समाधान व्यक्त,नूतन पोलीस निरीक्षक अवैद्य धंद्यांना आळा बसवणार का ?

देवगड,दि.१६ जानेवारी (गणेश आचरेकर)

देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची पोलीस स्थानकातून उचल बांगडी करण्यात आली असून लवकरच देवगड पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षकाचा पदभार कोण स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे . शहरात वाढते अवैद्य धंदे याबाबत लोकप्रतिनिधींनी सातत्याने आवाज उठवला होता. याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे देखील लक्ष वेधले होते.पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्याबाबत यापूर्वी अनेकदा माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या तसेच अनेक पक्षाच्या राजकीय प्रमुख लोकप्रतिनिधींनी देखील अवैद्य धंद्याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता.पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून नूतन पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर आळा बसविण्यात यशस्वी ठरतील का ? असा सवाल शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.

आमदार नितेश राणे यांनी शहरांमध्ये सुरू असलेले अवैद्य धंद्याबाबत देवगड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप करून हे धंदे बंद झाले नाही तर पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी जाहीर करू असे खुले आवाहन देखील दिले होते. त्यामुळे थोडेफार शहरातील अवैद्य धंद्यांवर आळा बसला होता.

कोकणपट्टीत सर्वात मोठी टेनिस डे नाईट क्रिकेट स्पर्धा म्हणून आनंदवाडी क्रिकेट स्पर्धेकडे पाहिले जाते गेल्या बावीस वर्षापासून शिस्तप्रिय डे नाईट क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा विक्रम आनंदवाडी ग्रामस्थ मंडळांनी केला मात्र ही स्पर्धा देवगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मैदानावर दिमाखात भरवली जात असून यावेळी पोलीस निरीक्षक यांनी आजूबाजूला खाद्य स्टोअर लावण्यास मज्जाव केला आणि मी इतर पोलीस निरीक्षकांपेक्षा वेगळा असल्याचा प्रयत्न करून स्टॉल लावण्यास मज्जाव केल्यामुळे क्रिकेट प्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यावेळी एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी चांगलीच कान उघडनी केली होती.

किंजवडे गावात बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणात गोवा बनावट दारू विक्री होत असल्यामुळे अनेक आजची युवा पिढी दारूच्या आहारी जात असल्याच्या तक्रारी वारंवार करून देखील देवगडचे पोलीस निरीक्षक याकडे गांभीर्याने पहात नसल्यामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी चक्क पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन बेकायदेशीररित्या गोवा बनवत दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आरे फाटा, लिंगडाळ,तळेबाजार देवगड सारख्या ठिकाणी गोवा बनवत दारू विक्रीवर मोठमोठ्या कारवाया करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश येत होते. मात्र देवगड पोलीस ठाण्याच्या वतीने दहा पंधरा बाटल्या दाखवून दिखाऊपणाची कारवाई केली जात होती.

देवगड ग्रामीण रुग्णालयातील शिवसेना उबाठा आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील ग्रामीण रुग्णालयात शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांना रुग्णालयाच्या परिसरात ठिया घालण्यास पोलीस निरीक्षकांनी मज्जाव केला असता तर शिवसेना उबाठा व भाजप कार्यकर्त्यांमधील राडा झालाच नसता या राड्या कारणीभूत कोण ? असा सवाल देखील यावेळी नागरिकांमधून या राड्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार भावली का ? अशी देखील चर्चा शहरांमध्ये रंगू लागली आहे.

देवगड शहरावर नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असलेल्या तिसऱ्या डोळ्याची माध्यमाने बातमी आपल्या विरोधात प्रसिद्ध केल्याचा राग धरून पत्रकारांना स्वतः च्या अधिकाराचा व पदाचा बेकायदेशीर वापर करून नोटीस काढण्याचा केविलवाणा प्रकार देखील याच पोलीस निरीक्षकांनी केला होता. मिठबाव येथील हत्या प्रकरणात ग्रामस्थांनी काढलेला भव्य मोर्चा असे एक ना अनेक कारणामुळे चर्चेत असलेल्या पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.