कणकवली दि.१३ एप्रिल(भगवान लोके)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कणकवलीच्या वतीने १४ एप्रिल रोजी कणकवली पटवर्धन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आधार कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी ११ वाजता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाला कणकवली शहरातील शासकीय अधिकारी तसेच वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर, प्रा. डॉ. सोमनाथ कदम,ऍड. संदिप वंजारे, शाहीर जनी कुमार कांबळे ,आनंद कासार्डेकर हे प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
गेली तीन वर्ष १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही पटवर्धन चौकामध्ये उत्साहात साजरी होत असते. यावेळी या ठिकाणी कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते ,व्यापारी तसेच सर्वसामान्य जनता या मंचावर येणार आहेत. या मंचावर वेगवेगळे प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरे केले जाणार आहेत. हा सर्वांसाठी खुला मंच असल्याने या ठिकाणी सर्व जाती, धर्माचे लोक येतात .
तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व प्रबोधनाच्या कार्यक्रम पाहण्यासाठी बहुसंख्य जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्यावतीचे मुख्य संयोजक ॲड. सुदीप कांबळे, सचिन तांबे,रोहित राणे. विश्वनाथ कदम यांनी केले आहे .