कणकवली तालुक्यात मनसे महायुती उमेदवाराच्या पाठीशी राहणार

कणकवली तालुका संपर्कप्रमुख विश्राम लोके

कणकवली दि.१३ एप्रिल(भगवान लोके)

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचे जाहीर केला. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे कणकवली तालुका संपर्कप्रमुख विश्राम लोके यांनी सांगितले.

कणकवली तालुक्यात संपर्कप्रमुख या नात्याने संघटना कार्य करीत असताना बहुतांशी गावात मनसेची संघटना बांधणी करण्यात येत आहे. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे. कणकवली तालुका संपर्कप्रमुख म्हणून अनेक गावात मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी करुन समस्या, विषयाची तड लावत आहेत.कार्यकर्त्यांनी मनसेच्या गाव येथे शाखा काढण्यास सुरुवात केली, मनसे कडे मोठा युवावर्ग असून याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना होईल,असे श्री.लोके यांनी सांगितले.