त्यामुळे दिपक केसरकर यांचा दुटप्पीपणाचा बुरखा फाटला गेला-तालुका संघटक मायकल डिसोझा
सावंतवाडी दि.१४ एप्रिल
दहशत दहशत म्हणून रान उठविणारे आज मांडीला मांडी लावून बसले आणि एकाच गाडीतून फिरले आहेत. त्यामुळे दिपक केसरकर यांचा दुटप्पीपणाचा बुरखा फाटला गेला आहे असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार आणि तालुका संघटक मायकल डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, संघटक मायकल डिसोझा व शिवदत्त घोगळे उपस्थित होते.
मायकल डिसोझा म्हणाले, दहशत दहशत म्हणून रान उठविले त्या ठिकाणी दिपक केसरकर आणि नारायण राणे मांडीला मांडी लावून बसले. एका गाडीतून शहरातून फिरत होते. दहशत म्हणून कसे बळी घेतले त्याबद्दल केसरकर थेट आरोप करायचे. पोपटाचा जीव बोलत. त्यामुळे पक्ष बदलू, दल बदलू केसरकर यांनी दहशत संपली म्हणून सांगावे .मग केसरकर यांच्या कार्यालयात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येतो तो कशाला? केसरकर खरे पोपट ठरले आहेत.
केसरकर भाजप मध्ये प्रवेश करतील असे चित्र आहे. ज्या पक्षात जातात ते त्या पक्षाचे होत नाहीत. केसरकर यांचा दुटप्पीपणा जनतेच्या निशाण्यावर आहे. मात्र केसरकर खरे पोपट ठरले असल्याने सत्तेसाठी पाहिजे ते करायला तयार आहेत. नारायण राणे यांनी केसरकर यांचा बुरखा फाडला आहे. केसरकर यांना सांगितलेली कामे करतात असे राणे म्हणाले त्यामुळे केसरकर यांचा दुटप्पीपणा जनतेच्या निशाण्यावर आहे, असे डिसोझा यांनी सांगितले.
उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार म्हणाले, केसरकर ज्या पक्षात जातात तेथे सोईचे राजकारण करत आहेत. नारायण राणे यांच्याशी जुळवून घेत आहेत. केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकटे फिरत नाहीत म्हणुन तापलेल्या तव्यावर भाकरी भाजून घेण्याचा केसरकर यांचा प्रयत्न आहे. मात्र मतदार संघात केसरकर यांच्या विरोधात लाट असल्याने एक लाख मताधिक्य कोठून देणार आहेत. केसरकर यांच्या सोईच्या राजकारणाची जनतेला कल्पना आली आहे. राणे यांनी केसरकर यांच्या भुलथापांना बळी पडू नये.