सावंतवाडी दि.१४ एप्रिल
कलंबिस्त प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये डिजिटल शाळा संकल्पना माझी शाळा डिजिटल शाळा हा उपक्रम राबवण्यात आला आहे.माजी विद्यार्थी रघुनाथ रामा सावंत त्यासाठी सहकार्य केले.या डिजिटल क्लासरूम शाळेचा लोकार्पण सोहळा या गावचे सुपुत्र अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत व माजी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते राघनाथ सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच सपना सावंत उपसरपंच सुरेश पास्ते हायस्कूल चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी सावंत, सोमा सावंत, अनिल सावंत, रामा म्हाडगूत, तुकाराम राऊळ, गजानन सावंत कृष्णा सावंत माजी सैनिक प्रकाश सावंत, यशवंत सावंत, अनंत सावंत, शांताराम म्हाडगूत, सत्यविजय राऊळ, राजेंद्र सावंत, सुरेश पास्ते, रमेश सावंत, शंकर पावसकर, सौ वसुंधरा सावंत कुमारी सावंत पालक वर्ग, आदी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना रघुनाथ रामा सावंत म्हणाले, ज्या गावच्या शाळेत शिकलो ती शाळा आजच्या काळात डिजिटल असायला हवी. त्या हेतूने मी माझ्या प्राथमिक शाळेला डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खरंतर आपल्या गावातील मुले आजच्या नव्या तंत्रज्ञानात प्रगतिशील असायला हवी या दृष्टीने आपण हा उपक्रम राबविला आहे. यापूर्वीही या गावाच्या शैक्षणिक विकासासाठी अनेकदा सहकार्यही केले आहे यापुढेही करेन या माध्यमातून मी माझे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी अँड सुहास सावंत म्हणाले, एका माजी विद्यार्थ्याने एका शुद्ध हेतूने आपल्या गावातील शाळेला एवढी सुविधा उपलब्ध करून दिले हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे दानशूर व्यक्तिमत्व मिळणे कठीण आहे रघुनाथ सावंत याने हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल निश्चितच मी त्याचे कौतुक करत आहे .
यावेळी माजी सैनिक प्रकाश सावंत, कृष्णा सावंत, शरद नाईक आदिनी आपले विचार मांडले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा सावंत आदींचा शालू देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय शेडगे यांनी केले.