लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या; रत्नागिरी जिल्ह्यातून ४ पोलीस निरीक्षक सिंधुदुर्गात बदली…
कणकवली दि.१७ जानेवारी(भगवान लोके)
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने कोंकण परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत निर्णय घेणकामी परिक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ न. च्या पोटकलम (२) अन्वये परिक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाने खालील निःशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे.त्यात सिंधुदुर्ग पोलीस दलातील ४ पोलीस निरीक्षकांच्या रत्नागिरी जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत.तर रत्नागिरी जिल्ह्यातून ४ पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग पोलीस दलात बदली होवून येणार असल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र प्रविण पवार यांनी काढले आहेत.
त्यात सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस निरीक्षक देवगड निळकंठ गोपाळकृष्ण बगळे,अतुल माधवराव जाधव,कणकवली पोलीस निरीक्षक अमित आनंदराव यादव,फुलचंद भगवानराव मेगई या चार पोलीस निरीक्षकांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली आहे.
तर पोलीस निरीक्षक भरत गोविंद धुमाळ,मारुती ज्ञानदेव जगताप,सरेश ठाकूर गावित,प्रदिप अरुण पांवार यांची रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग पोलीस दलात बदली झाली आहे.
पोलीस अधीक्षक यांनी उपरोक्त बदली आदेशाधीन असलेल्या निःशस्त्र पोलीस निरीक्षकांना बदलीवर सोडताना पर्यायी बदलीवर येणा-या पोलीस निरीक्षकांची वाट न पहाता बदलीवरील नेमणकीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच पोलीस निरीक्षकांना बदलीवर कार्यमक्त केल्याचा दिनांक तात्काळ या कार्यालयास कळवावा,असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र प्रविण पवार यानी काढले आहेत.