सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी प्रकाश करंगुटकर निधन

कणकवली दि.१४ एप्रिल

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी प्रकाश राजाराम करंगुटकर (वय ६५)मूळ देवगड वाडा तर येथील रहिवाशी व सध्या राहणार कणकवली बाजारपेठ यांचे गोवा बाबुळी येथे उपचारा दरम्यान रविवारी सकाळी १०.३० वाजता सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी
म्हणून त्यांनी आपल्या सेवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली. कडक शिस्तीचे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती.निवृत्तीनंतर ते कणकवली स्थायिक झाले, शहरातील सार्वजनिक उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. कणकवली शहरात त्यांना दाजी म्हणून ओळखत असायचे. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू होते. रविवार १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वाडातर येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, भाऊ जया, पुतणे जावई असा मोठा परिवार आहे.