ढोल ताशांच्या गजरात गोपाल कृष्णाची पालखी मिरवणूक मालवण दांडी गावात मोठ्या उत्साहात
मालवण,दि.१४ एप्रिल
मालवण दांडी येथील श्री देव श्रीकृष्ण मंदिर चौकचार मांड याठिकाणी श्री देव गोपाळकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उद्या दिनांक १५ एप्रिल पासून साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त आज रविवारी सायंकाळी चौकचार मांड येथून ढोल ताशांच्या गजरात गोपाल कृष्णाची पालखी मिरवणूक मालवण दांडी गावात मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
श्री देव गोपाल कृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या सोमवारी सकाळी अभिषेक, होम, सत्यनारायण महापूजा, आरती तसेच दुपारी तीर्थप्रसाद व महाभोजन, सायंकाळी ७ वाजता विरण यांचे संगीत भजन, रात्रौ ९:३० वाजता नाईक मोचेमांड यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीकृष्ण वाडीचे सुश्राव्य संगीत भजन, रात्रौ ९:३० वाजता बाल दांडेश्वर मंडळाचे ट्रिकसीन दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



