वेंगुर्ला ,दि.१५ एप्रिल
वेंगुर्ला शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविले आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीतून गुरूकुल परिक्षेत आत्रेया आचार्य (जिल्ह्यात २री, राज्यात ७वी), समर्थ वेंगुर्लेकर (जिल्ह्यात २रा, राज्यात ७वा), काव्या मांजरेकर (तालुक्यात ४थी, जिल्ह्यात १०वी), ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये आत्रेया आचार्य हिने सिल्व्हर मेडल प्राप्त केले. तिला शिक्षिका लीना नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता तिसरीमधून गुरूकुल परिक्षेत समर्थ गिरप (तालुक्यात २रा, जिल्ह्यात १० वा), स्वरा भुरे (तालुक्यात ४थी, जिल्ह्यात ११वी) तसेच ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये स्वरा भुरे हिने ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले. एसटीएसमध्ये शर्व आपटे, समर्थ गिरप, स्वरा भुरे यांनी सिल्व्हर मेडल तर मानस मालवणकर याने ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले. यांना शिक्षिका लीना नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता दुसरीमधून गुरूकुलमध्ये तनिष्का केळुसकर (राज्यात पाचवी), तनिषा केळुसकर (राज्यात तिसरी), विहान धुरी (राज्यात नववा), ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये समर्थसाई बुच्छलवार (तालुक्यात प्रथम-सिल्व्हर मेडल), वाणी बिजितकर (तालुक्यात दुसरी-सिल्व्हर मेडल), अस्मित गिरप (तालुक्यात तिसरा-ब्राँझ मेडल), तनिषा केळुसकर, तनिष्का केळुसकर व विहान धुरी (ब्राँझ मेडल), गंधर्व नायर (उत्तीर्ण), एस.टी.एस.मध्ये वाणी बिजितकर, तनिष्का केळुसकर, तनिषा केळुसकर (गोल्ड मेडल), विहान धुरी (सिल्व्हर मेडल), आराध्य रेडकर (उत्तीर्ण) यांना शिक्षिका गायत्री बागायतकर यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता चौथीमधून शुभ्रा अंधारी ही ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये तालुक्यात दुसरी आली. एस.टी.एस.मध्ये शुभ्रा अंधारी (सिल्व्हर मेडल) तर दर्श भोगटे, महंमद बागवान, सुरेंद्र बागायतकर (ब्राँझ मेडल), ए.पी.जे परिक्षेत शुभ्रा अंधारी हिने तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला तर दर्श भोगटे, काव्या आसोलकर, रूद्र वरक, महंमद बागवान, सुरेंद्र बागायतकर, योगेश मिशाळे, मिहिका वेंगुर्लेकर आदी उत्तीर्ण झाले. यांना शिक्षिका गायत्री बागायतकर यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता पाचवीतील तन्मय शितोळे हा गुरूकूल परिक्षेत तालुक्यात प्रथम आला. इयत्ता सहावीतील सार्थक यादव हा ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये तालुक्यात द्वितीय आला. इयत्ता सातवीमधून ए.पी.जे.परीक्षेत मयंक नंदगडकर तालुक्यात द्वितीय, ईशा गिरप ही टॉपटेनमध्ये तर रणवीरसिह रावळ हाही उत्तीर्ण झाला.
एस.टी.एस. परीक्षेत ईशा गिरप तालुक्यात प्रथम, मयंक नंदगडकर तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला. तर वैष्णवी केरकर, रणवीरसिह रावळ व दिव्या पाटील हेही उत्तीर्ण झाले.
या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले आहे.