मारूती स्टॉप येथे रामनवमी

वेंगुर्ला ,दि.१५ एप्रिल

मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात १७ एप्रिल रोजी रामनवमी निमित्त सकाळी १० वा. ह.भ.प.अवधुत बुवा नाईक यांचे किर्तन, दुपारी १२ वा. रामजन्म व पुष्पवृष्टी, सायं.७.३० वा.आरती व तीर्थप्रसाद, ८ वा. भजन होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.