आचरा रामेश्वर मंदिर येथे 18रोजी गंगापून कार्यक्रम

आचरा,दि.१७ जानेवारी(अर्जुन बापर्डेकर)
काकड आरती कार्तिकोत्सव मंडळ आचरा देवूळवाडी तर्फे पंढरपूर वारी निमित्त गुरुवार 18जानेवारी रोजी सकाळी रामेश्वर मंदिर येथे गंगापूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने तर रात्रौ ९ वाजता श्री ब्राह्मण देव विकास सांस्कृतिक प्रासादीक दिंडी मंडळ आचरा पारवाडीचा दिंडी कार्यक्रम होणार आहे .तरी सर्व भाविकांनी दुपारी महाप्रसाद आणि रात्रौ होणारया दिंडी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन काकड आरती कार्तिकोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.