आशिये गावचे ग्रामदैवत गांगो भैरीचा उद्या जत्रोत्सव…

आंब्रड येथील देवी भगवती ढोल पथकाचे होणार “ढोल वादन” ; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली दि.१७ जानेवारी(भगवान लोके)

तालुक्यातील आशिये गावचे ग्रामदैवत गांगो भैरीचा उद्या दि.१८ जानेवारी रोजी सालाबाद प्रमाणे जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुवा अभिषेक शिरसाठ यांचे सुस्वर संगीत भजन व आंब्रड येथील देवी भगवती ढोल पथकाचे “ढोल वादन” खास आकर्षण असणार आहे.

या जत्रोत्सवाच्या निमित्ताने १८ जानेवारी २०२४ ला सकाळी ७.३० वाजता नित्यपूजा,सकाळी १० वाजल्यापासून : दर्शन व माहेरवाशीण ओठी भरण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने,रात्रौ ८ वाजता श्री. आनंद मारुती बाणे यांचा गायनाचा कार्यक्रम,रात्रौ ९ वाजता : कोटेश्वर प्रसादिक भजन मंडळ हरकुळ खुर्द बुवा बुवा श्री. अभिषेक शिरसाट यांचे सुस्वर संगीत भजन, श्री देवी भगवती ढोल पथक आंब्रड यांचे ढोल वादन, रात्रौ १० वाजता : श्री पावणादेवी प्रासादिक दिंडी भजन, किंजवडे (परबवाडी) यांचे भजन,रात्रौ १२.३० वाजता : वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचे महान पौराणिक नाटक – धारातीर्थक्षेत्र होणार आहे. तरी भाविकांनी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गांगो-भैरी देवस्थान समिती आशिये यांच्या वतीने करण्यात आले आहे.