मालवण,दि.१५ एप्रिल
चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवणचे शहराध्यक्ष गणेश पाडगावकर, तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण, सुधाकर माणगावकर, विनायक भिलवडकर, दीपक माणगावकर, दीपक भिलवडकर, बाळकृष्ण जाधव, वळंजु आदी व इतर उपस्थित होते.