शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खा.विनायक राऊत उद्या उमेदवारी अर्ज भरणार…

महायुतीचा उमेदवार जाहीर नसला तरी ना.नारायण राणे,किरण सामंतानी घेतले अर्ज; महायुतीच्या उमेदवाराबद्दल उत्सुकता शिगेला..

कणकवली दि .१५ एप्रिल(भगवान लोके)

सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे उद्या १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे अद्यापही अधिकृत उमेदवार महायुतीकडून जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील मतदारांची उत्सुकता अशी गेल्या पोहोचली आहे.

शिवसेना पक्षाचे नेते किरण सामंत यांच्यासाठी आज अर्ज घेण्यात आले. तर भाजप नेते ,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उमेदवार अर्ज यापूर्वी घेतले आहेत. महायुतीचा उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीच्या वतीने १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद गट निहाय मेळावे देखील झाले आहेत. तसेच नाराणे यांनी रत्नागिरीतही प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.