“मल्लसम्राट” कुस्ती स्पर्धेत कासार्डेतील १२ कुस्तीगीरांचे वर्चस्व

तळेरे,दि.१७ जानेवारी

ना.दिपक केसरकर मित्र मंडळ यांच्यातर्फे सावंतवाडी येथील ‘शिव उद्यान’ येथे आयोजित “मल्लसम्राट ” खुल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे येथील कुस्ती केंद्रातील १२ खेळाडूंनी विविध वजनी गटात घवघवीत संपादन केले आहे.

यशस्वी कुस्तीपट्टू पुढील प्रमाणे-
मुलांच्या गटात-
१) ४० कि.ग्रॅ. वजन गटात- दुर्वास संजय पवार – सुवर्णपदक विजेता
२) ४८ कि.ग्रॅ. वजन गटात- विश्वास चंदु चव्हाण – रौप्यपदक,
३) तर याच गटात-पार्थ देसाई कांस्यपदक,
४) ७४ कि.ग्रॅ. वजन गटात- विघ्नेश संतोष पेडणेकर- कांस्यपदक
तर
मुलींच्या गटातून –
१) ३५ कि.ग्रॅ. वजन गटात- दुर्वा प्रकाश पाटील – रौप्यपदक
२) ४० कि.ग्रॅ. वजन गटात-कु.सना रहिमान शेख – कांस्यपदक
३) ४५ कि.ग्रॅ. वजन गटात- रिद्धी अरविंद परब – रौप्यपदक
४) ५० कि.ग्रॅ. वजन गटात- कु.साक्षी संतोष तेली – रौप्यपदक
५) तर याच गटात कु.विधी संजय चव्हाण- कांस्यपदक विजेती ठरली आहे.
६) ५५कि.ग्रॅ. वजन गटात- कु.आसावरी हर्षकांत तानवडे – रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे.
८) ६८ कि.ग्रॅम वजन गटात-बाळु राजू जाधव रौप्यपदक विजेता ठरला आहे.तर
९) ७४ कि.ग्रॅम वजन गटात गजानन राजेश माने याने सुवर्णपदक पटकाविले आहे.
वरील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी रोख रू २०००/- ,रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी रोख रू.१००० तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी रोख रूपये ५०० रुपये तसेच आकर्षक पदक व प्रमाणपत्र देऊन शालेय शिक्षण मंत्री मा.दिपक केसरकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.तसेच रोमहर्षक आणि प्रेक्षणीय कामगिरीबद्दल इ.६वीतील कु.धैर्या अरविंद परब हिला रोख ८०० रु देऊन अभिनंदन करण्यात आले.या खुल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत कासार्डे कुस्ती केंद्रातील सर्व कुस्तीपटूंनी मिळून रोख १५००० रुपये रक्कमेची बक्षिसे पटकावली आहेत.
तसेच या ठिकाणी सराव करीत असलेले आशिष जाधव यांनी यावर्षीचा ‘मल्लसम्राट’ हा किताब पटकाविला आहे.त्यांना रोख रक्कम चांदीची गदा, सन्मान मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सर्व यशस्वी खेळाडू हे कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी आहेत.
या यशस्वी खेळाडूंना कासार्डे प्रशिक्षण वर्गाचे दत्तात्रय मारकड,कुस्ती कोच अभिजित शेट्ये,आशिष जाधव,संघ व्यवस्थापक व कोच सोनु जाधव इतर प्रशिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.