रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून उमेदवारी अर्ज दाखल, विनायक राऊत यांच शक्ती प्रदर्श

लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांनी धरला ढोलाचा ठेका

देवगड,दि.१६ एप्रिल

रत्नागिरी : इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्गबलोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रत्नागिरीत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की मी उमेदवारी अर्ज भरला. माझा विजयनिश्चित आहे. महायुतीचा जो कोणी उमेदवार रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उभा राहील त्यांचा अडीच लाखांनी पराभव होणार आहे, असेही राऊत म्हणाले.

यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, युवा सेना अध्यक्ष वरून सरदेसाई, जिल्हा प्रमुख विलास चाळके, संदेश पारकर, अरुण दुधवडकर,अतुल रावराणे,राजेंद्र महाडिक, बंडया साळवी,आबा घोसाळे संजय साळवी, प्रशांत साळुंखे,संजय पडते, भाई गोवेकर, सुशांत नाईक, हरी खोबरेकर, युवती सेना पदाधिकारी रुची राऊत ,सचिन नगरसेवक बुवा तारी,नितीन बांदेकर, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम जयेशनर देवगड काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ढोल ताशांच्या गजरात ,घोषणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची भव्य मिरवणुकीस काढण्यात आली. शिवसैनिकांचा वाढता प्रतिसाद पाहून शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी खासदार विनायक राऊत यांनी स्वतः ढोल वाजव आनंद मध्ये सहभागी झाले