वैशिष्ट्यपूर्ण कलादालन अद्वितीय-नयना आपटे

वेंगुर्ला,दि.१७ जानेवारी

एकांकिका स्पर्धेच्या परिक्षणानिमित्त वेंगुर्ला येथे आलेल्या पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी १५ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कलादालनास भेट दिली.

मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी नयना आपटे व लेखक आनंद म्हसवेकर यांचे स्वागत करून त्यांना कलादालनाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर उपस्थित होते. कोकणची संस्कृती, विविध सण, उत्सव, वेंगुर्ल्यातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळे यांच्या हुबेहुब प्रतिकृतींसह माहिती दर्शविणारे वैशिष्ट्यपूर्ण असे कलादालन अद्वितीय असल्याचे गौरवोद्गार नयना आपटे यांनी काढले.