सावंतवाडी दि.१७ एप्रिल
भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जोरदार आघाडी घेतली असून पंचायत समिती मतदार निहाय ते बैठका घेत आहेत.
मंगळवारी आंबोली,माडखोल पंचायत समिती सह अन्य मतदार संघात त्यांनी सभा घेऊन भाजप महायुतीचा उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी आवाहन करत नियोजन केले.
आंबोली येथे महायुतीचा आंबोली पंचायत समितीचा कार्यकर्ता मेळावा माजी आमदार श्री.राजन तेली साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी आंबोली मंडळ अध्यक्ष श्री. रवींद्र मडगावकर, आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर,चौकुळ सरपंच श्री. भरत शेटवे,गेळे सरपंच श्री. सागर खेकरे,श्री.पांडुरंग गावडे, श्री. गुलाब गावडे, श्री.विशाल बांदेकर,श्री. गुलाब गावडे, श्री.प्रकाश गावडे, श्री. दत्तू नार्वेकर, श्री. हेमंत नार्वेकर, श्री. महादेव गावडे ,आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्तेआणि ग्रामस्थ उपस्थित होते.