नांगरतास येथे गवा रेड्याने ट्रक चालकाला धडक

आंबोली, दि.१७ एप्रिल
गवा रेड्याने ट्रक चालकाला धडक दिल्यामुळे गाडी बाजूच्या गटारात कलंडल्याचा प्रकार नांगरतास येथे घडला. यात विजय बहादुर संतराम (वय ३६, रा. उत्तर प्रदेश) हा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली. त्याठिकाणी पोलीस हवालदार दीपक शिंदे, एस पी पिरणकर, अभिजित कांबळे यानी जाऊन जखमीला आरोग्य केंद्रात आणून त्यावर उपचार डॉक्टरांनी केल्यानंतर पोलिसांनी जबाब लिहून घेतला.