देवबाग येथील विठ्ठल मंदिराचा २६ रोजी कलशारोहण सोहळा

मालवण,दि.१७ एप्रिल

देवबाग येथील श्री विठ्ठल मंदिराचा कलशारोहण सोहळा दि. २६ एप्रिल रोजी तसेच श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन दि. ३० एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंगळवारी १६ रोजी पुराणवाचन व कीर्तन संपन्न झाले. तर बुधवारी १७ रोजी रामनवमी उत्सव साजरा झाला. यानिमित्त गुरुवार, दि. १८ एप्रिल रोजी रात्री १० वा. चेंदवणकर गोरे दशावतार मंडळ कवठी यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘कर्कासूर वध, शुक्रवार, दि. २१ रोजी रात्री १० वा. बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार मंडळ नेरुर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘विधी संकेत’, शनिवार दि. २० रोजी रात्री १० वा. अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘भैरवनाथ जोगेश्वरी विवाह’, रविवार, दि. २१ एप्रिल रोजी रात्री १० वा. वालावलकर दशावतार मंडळ ओसरगाव यांचा पौराणिक नाट्य प्रयोग ‘ब्रम्हतेज’, सोमवार दि. २२ एप्रिल रोजी रात्री १० वा. सुधीर कलींगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा पौराणिक नाट्य प्रयोग ‘रुद्रायणी महिमा’, बुधवार, दि. २४ रोजी दुपारी ३ ते सायं. ६ वा. श्री महापुरूष मंदिर ते पेडणेकरवाडी – कलशाची भव्य मिरवणूक, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. प्रासाद शुद्धी, देवता स्थापना होम हवन, गो प्रवेश, सुहासीनीची जल कलश परिक्रमा आदी धार्मिक विधी होणार आहेत.

शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. देवतामूर्ती व कलशाला जलाधिवास, श्री गणेश व श्री शिवपिंडी प्रतिष्ठापना, सकाळी १०.३० वा. श्री नवनाथ श्रध्दास्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील नवनाथ उपासक प. पू. बाळकृष्ण घडशी महाराज यांच्या हस्ते कलश व ध्वजारोहण, पूज्य रमेश महाराज, सनातन संस्थेचे सद्‌गुरु सत्यवान कदम यांची उपस्थिती, दुपारी १२ ते ३ वा. आरती व महाप्रसाद आयोजक – अॅड. श्री. मनिष बाळासाहेब मगर, सायं. ५ ते ८ वा. श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी मंडळ, आचरा-पारवाडी आयोजक – समिक्षा डिजे साऊंड सर्व्हिस व मंडप डेकोरेटर, देवबाग रात्री १० वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळ कवठी यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘अजिंक्य मणी’, शनिवार दि. २७ एप्रिल रोजी रात्री १० वा. वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘अघोर लक्ष्मी’, दि. २८ एप्रिल रोजी रात्रौ १० वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘मातृवात्सल्य’, सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी श्री भूमिका देवी दशावतार (नितीन आशयेकर) यांचा पौराणिक रात्रौ १० वा. नाट्य प्रयोग ‘चित्रांगी गंधर्व उ‌द्धार’ सादर होणार आहे.

दि. ३० एप्रिल रोजी श्री विठ्ठल रखुमाई मुर्ती प्रतिष्ठापनेचा ७९ वा वर्धापन दिन सोहळा, सकाळी ७ वा. श्रींच्या मुर्तीवर दुग्धाभिषेक, सकाळी ८ वा. ओटी भरणे कार्यक्रम सायं. ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ६. वा. पुराण वाचन, पालखी प्रदक्षिणा, महाआरती व तीर्थप्रसाद, रात्री ८ वा. भजनाचा कार्यक्रम, रात्री १० वा. आरोलकर दशावतार नाट्च मंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘पुष्करणी तीर्थ’ दि. १ मे रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. तरी सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव विठोबा देवालय, देवबाग विश्वस्त व ग्रामस्थ यांनी केले आहे.