कणकवली तालुक्यात कनेडी, नांदगाव, तळेरे बाजारात पोलीस संचलन

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी संचलन

कणकवली दि.१७ एप्रिल(भगवान लोके)

आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर 7 मे 2024 रोजी जनतेने निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने कणकवली पोलिसांनी कणकवली तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठ असलेल्या कनेडी, नांदगाव ,तळेरे या ठिकाणी पोलीस संचलन केले आहे . यामध्ये ८ पोलीस अधिकारी, ८० पोलीस अंमलदार , ५० होमगार्ड यांचा समावेश होता.

यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आडाव , कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, मालवण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे , विजयदुर्ग पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. देठे ,रविंद्र शेगडे , श्री. पाटील असे वरीष्ठ पोलिस अधिकारी , पोलीस अंमलदार , होमगार्ड आदींचा संचलन मध्ये सहभाग घेतला.