एनएमएमएस परीक्षेत विठ्ठल कोरगांवकरचे यश

वेंगुर्ला,दि.१८ एप्रिल

महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेत वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता आठवीचा विद्यार्थी विठ्ठल प्रसाद कोरगांवकर हा ९५ गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तसेच ओबीसीमधून सिधुदुर्ग जिल्ह्यात त्याने दहावा क्रमांक पटकाविला आहे. त्याला श्रीनिवास सौदागर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.
फोटो – विठ्ठल कोरगांवकर