साटेली तर्फ सातार्डा देवळसवाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे कामांचा शुभारंभ

सावंतवाडी दि.१७ जानेवारी 
सावंतवाडी तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा देवळसवाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या आमदार निधीमधून रु. १० लक्ष मंजूर झाले असून त्याचे भुमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्री. नारायण राणे, संजयगांधी निराधार समिती अध्यक्ष श्री. गजानन नाटेकर, साटेली सरपंच सौ. श्रावणी नाईक, उपसरपंच श्री. सहदेव कोरगांवकर, श्री. आबा नाईक, सौ. अंबिका नाईक, संभाजी नाईक, स्वप्नील जाधव, शंकर साटेलकर, राजन नाईक, सचिन तावडे, सुरेश नाईक, बाळा तावडे, पप्पू सावंत, गजा सावंत, चंद्रकांत सावंत, नारायण देऊसकर, नारायण जोग व शिवसैनिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.