नगरपंचायत कार्यक्षेत्रातील स्वच्छता अभियानात नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांच्या हाती झाडू….

देवगड, दि.१७ जानेवारी
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या १५ जानेवारीच्या पत्राच्या अनुषंगाने देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील २३ मंदिर व परिसर स्वछता अभियान दि.१६ ते १८ जाने.या कालावधीत राबविण्यात आले आहे.शहरातील मंदिरे व मंदिर परिसरातील स्वच्छता करणे बाबत पुढील तीन दिवसात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे तर या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन देवगड जामसंडे नगरपंचायत चे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी केले होते. त्या अनुषंगाने दिनांक १६ जानेवारी रोजी दिर्बादेवी मंदिर ,रामेश्वर मंदिर हनुमान मंदिर जामसंडे साई मंदिर खाक्षी, साई मंदिर
मळई,हनुमान मंदिर मळई,ब्राम्हणदेव मंदिर देवगडया ठिकाणी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू,स्थानिक नगरसेवक प्रणाली माने,नितीन बांदेकर , रोहन खेडेकर,,ऋचाली पाटकर, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते
१७ जाने.रोजी स्वामी समर्थ मंदिर ,आनंदवाडी विठ्ठल मंदिर,हनुमान मंदिर,श्रीराम मंदिर,मारुती मंदिर बाजारपेठ विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी,गणपती मंदिर किल्ला,दत्त मंदिर कावलेवाडी, चव्हाटेश्वर मंदिर पिरवाडी, या मोहिमेत उपनगराध्यक्ष मिताली सावंत निवृत्ती तारी,प्रणाली माने ,संतोष तारी,नगरसेवक स्वरा कावले, व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला दि.१८ जाने हनुमान मंदिर किल्ला,दत्त मंदिर ,विठ्ठल मंदिर तारामुंबरी, हनुमान मंदिर तारामुंबरी,श्री राम मंदिर भटवाडी,मारुती मंदिर देवगड बसस्थानक,गणपती मंदिर सात पायरी देवगड या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

.