केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कांदळगाव येथील ग्रामदैवत श्री रामेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले

मालवण,दि.१८ एप्रिल

लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव जाहीर झाल्यावर आज दुपारी नारायण राणे यांनी मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील आपले ग्रामदैवत श्री रामेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रामेश्वर चरणी “राणे यांचा बहूमताधिक्याने विजय व्हावा”, असे साकडे घातले. राणेसाहेब आगे बढो… हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

उमेदवारी जाहीर झाल्यावर आज दुपारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कांदळगाव येथे आगमन झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत राणे यांचे स्वागत केले. यानंतर राणे यांनी पत्नी सौ. नीलम यांच्यासमवेत श्री रामेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी पुरोहितानी राणे यांच्यासाठी साकडे घातले. तर भाजप कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा बहूमताधिक्याने विजय व्हावा असे साकडे घातले. हे साकडे घालतानाच भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी नारायण राणे विजयी झाल्यावर रामेश्वर मंदिरात महारुद्र व महाप्रसाद आयोजित करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, विजय केनवडेकर, शर्वरी पाटकर, राजन वराडकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, अंजली पराडकर , महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, विकी तोरसकर, तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, आबा हडकर, जॉन नरोना, नारायण धुरी, संतोष पालव, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, शामा मुळये, संतोष पारकर, आबा साळकर, उमेश कोदे, भाऊ गुरव, संजय परब, मधुसूदन परब, विशाल राणे, अमोल वारंग, संतोष मुसळे, आबा साळकर, शारदा मुळये, संजना परब, भाग्यश्री डिचवलकर, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, संग्राम साळसकर, ललित चव्हाण, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर, राजु बिडये, रवी मालवणकर, विहार कोदे, संदीप परब, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, संजय कदम, यशा मालंडकर, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

यावेळी दत्ता सामंत यांनी “अब की बार, चारसो पार” हे भाजपचे लक्ष्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात पुन्हा एकदा अधिक बळकट करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया. राणे चार लाख मताधिक्याने विजयी होतीलच, असा ठाम विश्वास भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.