डी. जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी, फाउंडेशन कोर्स इन आर्टचे वार्षिक कलाप्रदर्शन ‘कसब – २०२४’ चे आयोजन.

सावंतवाडी,दि.१८ एप्रिल
येथील डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी, फाउंडेशन कोर्स इन आर्टचे वार्षिक कलाप्रदर्शन ‘कसब २०२४’ चे उद्घाटन दि .२० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे .दि. २० व २१ एप्रिल या कालावधीत सर्व कलारसिकांसाठी खुले राहील. सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जाहिरात व कलाक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेले काम पाहण्याची संधी कलारसिकांना प्राप्त होत आहे. सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे करण्यात आले आहे.