सावंतवाडी पत्रकार संघाकडून डॉ.मधुरा शिरसाट हिचे कौतुक

सावंतवाडी दि.१७ जानेवारी 
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार कै. अरविंद शिरसाट यांची सुकन्या मधुरा अरविंद शिरसाठ हिने बी ए एम एस आयुर्वेद डॉक्टर ही पदवी संपादन केली.या यशाबद्दल कौतुकाची थाप म्हणून सावंतवाडी जिमखाना (दि.१४ )ला सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर व पत्रकारसंघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते तिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय देसाई, प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर,अभिमन्यू लोंढे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,सचिव मयूर चराठकर सहसचिव विनायक गावस,
उपाध्यक्ष दीपक गांवकर,सदस्य राजू तावडे, हर्षवर्धन धारणकर,अभय पंडीत, उमेश सावंत,वैशाली खानोलकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव सुरेश भोगटे, उमेश कोरगांवकर,माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत आर्य शिरसाट आदि उपस्थित होते.
स्वर्गीय अरविंद शिरसाट यांचे आपली मुलगी डॉक्टर व्हावी हे स्वप्न होते ते स्वप्न त्यांच्या पश्चात पूर्णत्वास आले.डॉ. मधुरा हिने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत इतराना प्रेरणा दायी ठरेल .येणाऱ्या काळात आपल्या हातून गोरगरीब जनतेसाठी सेवा घडो अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरानी दिल्या.