न्हावेली गावातील जीर्ण झालेले पोल तात्काळ बदला न्हावेली ग्रां प सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा

सावंतवाडी दि.१७ जानेवारी

न्हावेली गावातील विद्युत वाहिन्यांच्या लोखंडी पोल मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेल्या आहेत मागील आठवड्यात न्हावेली मेस्त्री वाडी येथे लोखंडी पोल पूर्ण गंजून तुटून पडल्याने आजूबाजूच्या परिसरातील गवताला आग लागली होती भविष्यात अशा घटना घडू नयेत व कोणत्याही प्रकारचे नुकसान व जीवित हानी यासारख्या दुर्घटनांपासून सावधनतेसाठी आपण ताबडतोब न्हावेली गावातील जीर्ण लोखंडी पोलांचे सर्वेक्षण करून ते बदलावेत असे निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते व न्हावेली ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांकडे केली तर वीज अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती घेत जीर्ण झालेले पोलंचे टेकनिकल टीम घेऊन सर्वेक्षण करून खराब झालेले पोल तात्काळ बदलण्याची ग्वाही उपस्थित वीज अधिकाऱ्यांनी दिली. तर तात्काळ हे काम हाती घ्या अन्यथा कोणतीही जीवित हानी अथवा नुकसान झाल्यास आपल्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थितांनी दिला ह्यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार न्हावेलीं ग्राम पंचायत सदस्य अक्षय पार्सेकर ग्राम पंचायत सदस्य आरती माळकर सामाजिक कार्यकर्ते संदेश सावंत प्रकाश साटेलकर सुनील नाईक आबा चिपकर निलेश देसाई बाळू सावळ, नवनाथ पार्सेकर रुपेश पार्सेकर राज धवन प्रथमेश नाईक आदी उपस्थित होते.