मालवण,दि.१९ एप्रिल
रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व इंडीया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या मालवण शहरातील प्रचाराचा शुभारंभ मालवण देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर येथे करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी श्री देव रामेश्वर चरणी विनायक राऊत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा, असे गाऱ्हाणे घालत शहरातील प्रचारास सुरुवात केली.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे काँग्रेस विधानसभा मतदारसंघ प्रमुख अरविंद मोंडकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, नितीन वाळके, शिवसेना शहराध्यक्ष बाबी जोगी, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष सेजल परब, मंदार ओरसकर, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत परुळेकर, बाळू अंधारी, यतीन खोत, जेम्स फर्नांडिस, महेश जावकर, यशवंत गावकर, शिवसेना तालुकाप्रमुख दिपा शिंदे, शिवसेना महिला तालुका समन्वय पूनम चव्हाण, वायरी ग्रामपंचायत सदस्य ममता तळगावकर, पराग माणगावकर, लुईस मेंडीस, रश्मी परुळेकर, निनाक्षी मेथर, आकांक्षा शिरपुटे, नीना मुंबरकर, गणेश पाडगावकर, भिवसेन परुळेकर, विजय नेमळेकर, नरेश हुले, मंदा जोशी, मोहन मराळ, सिद्धेश मांजरेकर, राजू परब, मनोज मोंडकर, हेमंत मोंडकर, गौरव वेर्लेकर, बंड्या लुडबे सोबत शहरातील सर्व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप पदाधिकारी, कार्यकर्ते, इंडिया आघाडी कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.