सावंतवाडी दि.१९ एप्रिल
गेली सहा वर्षांपूर्वी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले इस्माईल महंमद नदाफ यांना अद्यापही शिक्षण विभागाकडून पेन्शन लागू झालेली नाही सदरची पेन्शन लागू हवी यासाठी शिक्षण विभागाचे दरवाजे ते ठोठवत आहेत. आज त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र शिक्षणाधिकारी यांच्या आश्वासनामुळे उपोषण स्थगित केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण विभाग सदर पेन्शन बाबत चालढकलपण करत पेन्शन लागू होणारे कागदपत्रे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालया पाठवण्याऐवजी सदर शाळेच्या संस्थेकडे पाठवीत आहेत त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाचा हा गोंधळी कारभार बाबत श्री नदाफ यांनी नाराजी व्यक्त केली असून जर का माध्यमिक शिक्षण विभागाने पेन्शन लागू करण्याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास आणि सदर पेन्शन लागू होणारी न्यायालयाच्या आदेशाची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालया पाठवून न दिल्यास माध्यमिक शैक्षणिक विभागाच्या कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणा ला बसण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे ३० जून २०१८ रोजी मुख्याध्यापक पदावरून सेंट्रल उर्दू हायस्कूल मधून आपण सेवानिवृत्त झालो मात्र त्यानंतर आपल्याला जी पेन्शन लागू व्हायला हवी होती ती लागू झाली नाही त्यामुळे आपण न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले न्यायालयाने पेन्शन लागू होण्यासंदर्भात आदेशहीत काढलेत सदर आदेशाच्या प्रती आपण माध्यमिक शिक्षण विभाग कडे पाठवल्या मात्र माध्यमिक शिक्षण विभागाने सदरच्या न्यायालयाच्या आदेशाची कागदपत्रे ही वरिष्ठ कार्यालय उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडे पाठवण्याऐवजी शाळेच्या संस्थेकडे पाठवून न्यायालयाच्या आदेशाचे अवमान केले आहे त्यामुळे माझी पेन्शन लागू होण्यापासून माध्यमिक शिक्षण विभाग ज्या पद्धतीने चालढकलपणा करत आहे ते अयोग्य आहे माध्यमिक शिक्षण विभागाने न्यायालयाच्या आदेशाची कागदपत्रे जर वरिष्ठांकडे पाठवली नाहीत तर मला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असे त्यांनी इशारा दिला होता.
दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित केले.