उमेदवार श्री विनायक राऊत २० एप्रिल रोजी श्री देव पाटेकर मंदिर (राजवाडा) येथे प्रचाराचा नारळ ठेवणार

सावंतवाडी दि.१९ एप्रिल 
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेना उमेदवार श्री विनायक राऊत हे शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी सावंतवाडी श्री देव पाटेकर मंदिर (राजवाडा) येथे प्रचाराचा नारळ ठेवणार आहेत.
यानंतर सावंतवाडी बाजारपेठ येथे पदयात्रा व प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. सर्व महाविकास आघाडीचे बेसिक पदाधिकारी,महिला आघाडी, युवासेना,आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केले आहे.