सावंतवाडी दि.२० एप्रिल
जी ए कुलकर्णी शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रम बुधवार दि.१ मे रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
निलायम आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या सहयोगाने श्रीराम वाचन मंदिर ने जी ए कुलकर्णी शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रम आयोजित केला आहे. या अभिवाचन कार्यक्रमांमध्ये माधवी शिरसाट पारध या कथेवर, कल्पना बांदेकर भेट या कथेवर, ज्योती तोरसकर नाग या कथेवर तर वामन पंडित दीपस्तंभ या कथेवर अभिवाचन करणार आहेत. हा कार्यक्रम सुमारे दोन तास चालेल अशी अपेक्षा आयोजकांनी केली आहे.