सावंतवाडी,दि.२० एप्रिल
वैश्यवाडा कला क्रिडा मंडळ , श्री हनुमान मंदिर उत्सव समितीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात तब्बल २८ रक्तदात्यांनी रक्तदान करुन समाजाप्रती क्रुतज्ञता व्यक्त केली.
वैश्यवाडा येथे दि. 20 एप्रिल रोजी हे रक्तदान शिबीर संपन्न झाले. प्रारंभ डॉ. रोहीणी बांदेकर यांचेहस्ते दिपप्रज्वलनाने शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष दिपक म्हापसेकर, उपाध्यक्ष वैशाख मिशाळ, सचिव अण्णा म्हापसेकर, कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसवेक आनंद नेवगी, माजी नगरसेविका सौ. शुभांगी सुकी, सौ. गिता सुकी, संजय म्हापसेकर, आनंद म्हापसेकर, गजा कोदे , विकास सुकी वगैरे उपस्थितीत होते.
या शिबीरासाठी रक्तमित्र बाबली गवंडे, सावंतवाडी रक्तपेढीच्या डाॅ. दिप्ती बुवा, प्राजक्ता रेडकर सिस्टर, मानसी बागेवाडी सिस्टर, रक्तपेढी सहाय्यक श्री. अनिल खाडे, रक्तमित्र सिद्धार्थ पराडकर तसेच मंडळाचे कार्यकर्ते गजा कोदे, सिद्धी सुकी, राजश्री म्हापसेकर , प्रथमेश टोपले, संकेत शिरसाट विनू सुकी यांनी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबीरामध्ये वेदांत म्हापसेकर, सुनिल बरागडे, सागर मुंज, दत्तराज पांगम, लक्ष्मण कावले, राजेश पनवेलकर, रुपेश कुडतरकर, सौरभ म्हापसेकर, प्रथमेश टोपले, मनोहर गावडे, केतन कालेलकर, गौरेश मिशाळ, संकेत शिरसाट, बाबली गवंडे, ओमकार पोकळे, तन्मय पोकळे, रविचंद पालकर, सुमित गायकवाड, निरंजन सावंत, अमोल मुंज, अनिशखान बिजली, नंदकिशोर राऊळ, अनिल गावडे, गणेश खोरागडे, शुभम लाखे, आसिफ बिजली, साईनाथ म्हापसेकर, परशुराम केदार यांनी रक्तदान केले.