माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,उमेश कोरगावकर यांची घेतली खासदार विनायक राऊत यांनी भेट

सावंतवाडी दि.२० एप्रिल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व माजी नगरसेवक उमेश कोरगावकर आदींची इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, संदीप नाईक व सहकारी उपस्थित होते.
बबन साळगावकर, उमेश कोरगावकर व उपस्थित सहकाऱ्यांची चर्चा खासदार विनायक राऊत यांनी केली. या निवडणुकीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे असे सांगितले.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जान्हवी सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, अँड. दिलीप नार्वेकर, रूची राऊत, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, समीर वंजारी, बाळा गावडे, शब्बीर मणियार, रमेश गांवकर, शैलेश गवंडळकर, सावली पाटकर, सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, काशिनाथ दुभाषी, समिरा खलिल, आदी महाविकास आघाडीची पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.