नाटेकर आजींचा तपपूर्ती सोहळा २३ रोजी

 मालवण,दि.२० एप्रिल

कोळंब येथील श्री संत नाटेकर आजींचा २९ वा तपपूर्ती सोहळा दि. २३ एप्रिल रोजी होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन प. पू माताजी नाटेकर सेवामंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र प्रभूगावकर यांनी केले आहे.