उपरकर आम्हाला हॅरेस्टमेंट करत आहेत ; तक्रारी करण्यापेक्षा विकासात मार्गदर्शन करा
कणकवली,दि.१७ जानेवारी ( भगवान लोके )
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन चांगली कामे करण्याचा प्रयत्न आहे. मात्र गेल्या वर्षभरात माजी आमदार परशुराम उपरकर ते केलेल्या कामांवर केवळ माहीतीच्या अधिकारात अर्ज करतात . विनाकारण उपरकर आम्हाला हॅरेस्टमेंट करत आहेत. कारण राष्ट्रहितासाठी आम्ही काम करतो. आम्ही कुठल्याही एजन्सीच्या चौकशीला तयार आहोत , अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
माझ्या माहितीनुसार दहा लाखाच्या वरती सर्व कामे ई-टेंडर ने केली जातात. ई टेंडर हे पारदर्शक आहे, यामध्ये कार्यकारी अभियंताला डायरेक्ट कोणालाही टेंडर देण्याचे अधिकार नाही आहेत. जी काही निविदा प्रक्रिया राबवली गेली आहे त्यामध्ये दहा लाख ते एक कोटीचे अधिकार कार्यकारी अभियंताला आहेत. एक कोटी ते अडीच कोटीचे अधिकार अधीक्षक अभियंताला आहेत. अडीच कोटी ते त्याच्यावरील सर्व कामांचे अधिकार मुख्य अधीक्षकांकडे आहेत. ई टेंडर मध्ये काहीही मॅनेज करण्याची सुविधा नाही. हि पारदर्शक कार्यप्रणाली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप आहेत ते बिनबुडाचे आरोप असल्याचे असे श्री. सर्वगोड यांनी सांगितले.
परशुराम उपरकर यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाची चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. शासनाचा एकही रुपयाही वाया न जाण्यासाठी आम्ही काम करत आहोत . जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कशाप्रकारे वाढेल याकडे माझे व आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे यामध्ये कोणतेही दुमत नाही आहे.
परशुराम उपरकर हे हुशार माजी आमदार आहेत. यात कोणतेही संदेह नाही. उपरकर हे गेली वर्षभर शासनाचे झालेली कामांच्या बाबतीत माहितीच्या अधिकारात टाकून नुसती माहिती विचारत आहेत. ते कोणतेही विकासात्मक काम करा, किंवा कोणत्याही कामाबाबत हे काम का पूर्ण होत नाही. त्यासाठी कधीही फोन करत नाहीत. तसेच राज्य शासनाकडून एखादे काम मंजूर करून आणताना दिसत नाहीत. परशुराम उपरकर यांनी जिल्ह्याच्या विकासात्मक काम करावे मात्र ते माहितीच्या अधिकार टाकून आमच्यासारख्या अधिकाऱ्यावर दबाव आणत आहेत. त्यापेक्षा उपरकर यांनी आम्हाला जिल्ह्याच्या एखाद्या विकासातील कामाचा संदर्भात सहकार्य करावे. जेथे कुठे चुकत असेल त्यावेळी चूक दाखवून द्यावी. असे आवाहन श्री. सर्वगोड यांनी परशुराम उपरकर यांना केले आहे.