राऊतांच डिपॉझिट जप्त करणार : नारायण राणे

विनायक राऊतांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत : दीपक केसरकर

सावंतवाडी,दि.२० एप्रिल

महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचं डिपॉझिट शिल्लक ठेवणार नाही. विनायक राऊत यांच डिपॉझिट जप्त करून मी निवडून येणार असा दावा महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. तर रत्नागिरी-सिंधुदुर्गचा येणारा काळ उज्वल असेल असं मत राणेंनी व्यक्त केल. तर विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. त्यांना याचा विसर पडला आहे. राऊत यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात मंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना केला.

ते म्हणाले, दिल्लीच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंनी नेतृत्व केलं आहे‌. पुन्हा एकदा त्यांनी शपथ घ्यावी अशी जनतेची इच्छा आहे. भरघोस मतांनी त्यांना निवडून देत मोदींच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा पाठवणार आहे. येथील रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात येत आहे. सिंधुदुर्गतील लोकांना रोजगारासाठी गोव्याला जाव लागू नये यासाठी पुढाकार घेतला आहे. २०० कोटींचा प्रकल्प इथे होत आहे. उद्धव ठाकरे, विनायक राऊत दहा वर्षांत काहीही करू शकले नाहीत. नारायण राणे यांनी या जिल्ह्याच्या कोकणच्या विकासासाठी मोठ योगदान दिलं आहे‌. विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. ते अपघातानं खासदार झाले आहेत. आता त्यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला.

याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादीचे सुरेश गवस, युवराज लखमराजे भोंसले आदी उपस्थित होते.