डामरे येथील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश

सलग अकराव्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के ;आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

कणकवली दि.२१ एप्रिल(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील डामरे गावातील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.भाजपा आ.नितेश राणे यांनी सर्वांचे स्वागत केले .

ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव आदी उपस्थित होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून डामरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन रघु जाधव व कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.

यावेळी मिलिंद मेस्त्री, माजी सरपंच बबलू सावंत, डांबरे सरपंच किरण कानडे, ग्रा.स‌. संतोष मेजरी, उपसरपंच सागर साटम, संदीप साटम, सुमित मेजारी, प्रथमेश दळवी, आदि भाजप उपस्थित होते..