माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व बंडू हर्णे यांची प्रतिक्रिया ;कणकवलीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
कणकवली दि.२१ एप्रिल(भगवान लोके)
कणकवली शहराचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.पहिल्या दिवशी कणकवली शहरातील ५ वार्डमध्ये प्रचार करण्यात येणार आहे.कणकवली शहरात राणेंना मताधिक्य, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी, मनसे, आरपीआयचे घटक पक्ष महायुती उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली शहरातील प्रचाराचा शुभारंभ रविवारी श्री देव स्वयंभू मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा शहर अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, किशोर राणे, बाबू गायकवाड, अभिजीत मुसळे, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, कविता राणे, मेघा सावंत, चारुदत्त साटम तसेच गंगाधर सावंत, संजना सदडेकर, संजिवनी पवार, सुशिल पारकर, महेश सावंत, पंकज पेडणेकर, मंदार कोदे, नंदू वाळके, राजा पाटकर, बाळा सावंत, सचिन कुवळेकर आदी उपस्थित होते.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मताधिक्य मिळावे,यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसरात राणेंच्या विजयासाठी घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.