खास.विनायक राऊत यांच्या प्रचाराचा कलमठमध्ये शुभारंभ

कणकवली २१ एप्रिल (भगवान लोके)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्‍वर मंदिर येथे करण्यात आला.

यावेळी माजी जि. प. सदस्या स्वरुपा विखाळे, उद्योजक रामदास विखाळे, शिवसेना ठाकरे गटाचे कलमठ विभागप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवा सेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, ग्रा. पं. सदस्या प्रियाली आचरेकर, योगिता चव्हाण, माजी ग्रा. पं. सदस्य राजू राठोड, वैदेही गुडेकर, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, बाबू कोरगावकर, नंदकिशोर कोरगावकर, बचू कांबळे, परेश आचरेकर, अनंत कदम आदी उपस्थित होते.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार खास.विनायक राऊत हे पुन्हा विक्रमी मताधिक्यांनी निवडून येऊ दे, असे गार्‍हाणे श्री देव काशीकलेश्‍वर चरणी शिवसैनिकांनी घातले.