आजगाव साहित्य कट्ट्यावर गीतरामायणावर चर्चा

सावंतवाडी दि.२१ एप्रिल 
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा बेचाळीसावा मासिक कार्यक्रम रविवार दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव मराठी शाळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याचे सदस्य गीतरामायणामधील विविध गीतातील भाषा सौंदर्याविषयी बोलतील. भाषाप्रभू ग.दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतांमधील यमके, शब्दसौंदर्य, उपमा, प्रसंगवर्णन आदी गोष्टी सोदाहरण स्पष्ट करतील.
तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.