मालवण कट्टा येथील व्यापारी व जैन समाज बांधव वेदांत दोषी याने सीए परीक्षेत ५८३ गुण मिळवून भारतात ४१ वा आला

देवगड,दि.१७ जानेवारी
मालवण कट्टा येथील व्यापारी व जैन समाज बांधव अमोल साळवी यांचा भाचा रविकिरण दोषी नारायण पेठ पुणे यांचा मुलगा वेदांत रविकिरण दोषी याने सीए परीक्षेत ८००पैकी ५८३ गुण मिळवून भारतात ४१ वा आला आहे.या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून भारतीय जैन संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दयानंद मांगले व जैन समाज बांधवांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.