हनुमान जयंतीनिमित्त वायरी भरडेवाडा येथे कार्यक्रम

मालवण, दि. २१ एप्रिल

हनुमान जयंती उत्सवानिमित्त श्री मारुतीमंदिर वायरी रोड भरडेवाडा येथे दि. २२ व २३ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ रोजी सायंकाळी ६ वाजता भजने, २३ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता ह. भ. प. महेश धामापूरकर यांचे हनुमान जन्मोत्सवावर कीर्तन, दुपारी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता संगीत भजने, रात्री ९.३० वाजता रंगखांब ग्रुप कणकवली प्रस्तुत व्हरायटी शो होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान मित्रमंडळ वायरी भरडेवाडा यांच्यावतीने करण्यात आले आहे