मालवण,दि. २१ एप्रिल
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे दि. २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात सकाळी ८ ते ११ या वेळेत ‘गंमत जंमत विज्ञान कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत मुंबईतील माजी प्राचार्य प्रा. डॉ. हेमंत पेडणेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हवामान घटक उपकरणे तयार करणे, भुरूपांची मॉडेल्स तयार करणे, सर्वेक्षण नकाशा तयार करणे, नकाशा व नकाशाचे प्रकार, अभ्यास सोप्या करण्याच्या युक्ती, सॉफ्ट स्किल अशी या कार्यशाळेची वैशिष्ट्ये आहेत. १० वर्षावरील विद्यार्थी व विद्यार्थिनीं यामध्ये सहभागी होऊ शकतात, प्रथम येणाऱ्या ४० जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ९४२३९४६००३, ९४२३६७३४३२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.