लोकसभेच्या कोणत्याही उमेदवाराला गाबीत समाजाचा पाठिंबा नाही

 देवगड येथील गाबीत समाज बांधवांच्या बैठकीत घेतला निर्णय

देवगड,दि. २१ एप्रिल

गाबीत समाज बांधव “सहभाग समेशी” गाबीत समाज संस्थेचा कोणताही संबंध नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गाबीत समाजातील कोणतीही गाबीत समाजाची संस्था कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे
गाबीत समाज सिंधुदुर्गच्या २१ एप्रिल, २०१४ च्या जिल्हा बैठकीमध्ये ठरविण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,गाबीत समाज,महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग व गाबीत समाज, देवगड यांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यापूर्वी कर्जत- खोपोली येथे झालेल्या चिंतन शिबीरामध्ये झालेल्या चर्चेमध्ये समाजातील प्रत्येक बांधव कुठल्या ना कुठल्या पक्षाशी निगडीत असतो त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा न देण्याचे ठरविले होते. मात्र गाबीत समाजातील प्रत्येकाने आपल्या पक्षाचा व नेत्यांचा प्रचार करण्यास हरकत राहणार नाही.तसेच गाबीत समाजाचा उमेदवार उभा असेल व त्यास गाबीत समाज संघटनेचा पाठिंबा हवा असेल तर अशा गाबीत उमेदवाराला समाजातील घटकाने सहकार्य करण्यास हरकत असणार नाही. तसेच गाबीत समाजबांधवांनी पक्षीय उमेदवारांसाठी गाबीत समाज संघटनेचा वापर करण्यात येऊ नये.
२६ एप्रिल, २०२४ रोजी देवगड येथे होणाऱ्या सभेला गाबित समाजाच्या सर्व संस्थाचा कोणताही
पाठिंबा नाही व त्या संस्थाचा सुतमात्र संबंध नाही.याची गाबित समाजातील सर्व बांधवांनी नोंद घ्यावी, असे अखिल भारतीय गाबीत समाज, महासंघ
गाबीत समाज, महाराष्ट्र, गाबीत समाज, सिंधुदुर्ग व गाबीत समाज देवगड यांनी
जाहीर केले.
देवगड शिक्षण भवन हॉल येथे झालेल्या या गावीत समाज जिल्हा बैठकीस अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ- अध्यक्ष श्री. परशुराम उपरकर, महासंघ माजी अध्यक्ष – श्री काशिनाथ तारी.गाबीत समाज महाराष्ट्र- सरचिटणीस – श्री. गणपत मणचेकर.
गाबीत समाज, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष , श्री. चंद्रशेखर उपरकर ,
गाबीत समाज, देवगड अध्यक्ष , संजय पराडकर उपाध्यक्ष- लक्ष्मण तारी,सचिव संजय बांदेकर आणि देवगड कार्यकारिणी सदस्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.