प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थानमार्फत विविध कार्यक्रमाद्वारे श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर वालावल येथे साजरा

सावंतवाडी,दि.२२ एप्रिल

रामनवमीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे श्रीम. मनोरामा महादेव चौधरी चारिटेबल ट्रस्ट वालावलं व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थानमार्फत विविध कार्यक्रमाद्वारे श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर वालावल येथे साजरा करण्यात आला.
रामनवमी व एकादशी या दोन दिवशी सर्व भाविकांना मोफत सरबत वाटप करण्यात आले. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, निवती पोलीस स्टेशनचे अधिकारी जयेश ठाकूर, कर्मचारी मारुती कांदळगावकर, सचिन सोनसुरकर, नितीन शेडगे, त्याच प्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत,व इतर मान्यवरानी स्टॉलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये, जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांचा, संस्थामार्फत सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पत्रकारितेत विविध पुरस्कार मिळविलेले प्रमोद महाडगूत, निलेश जोशी, वैशाली प्रभूखानोलकर, यांना गौरविण्यात आले. साहित्यिक प्रसाद केळुसकर, शिल्पकार लक्ष्मण गवंडे, चित्रकार राजेश आजगावकर, शिक्षण क्षेत्रात प्राविण्य मिळविलेली कुमारी सिया देसाई, स्विमिंगमध्ये विविध पुरस्कार मिळविलेली पूर्वा गावडे, त्याचप्रमाणे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती प्राप्त व जीची निवड इस्त्रो दौऱ्याकरिता झाली आहे ती कुमारी दूर्वा प्रभू, तसेच वालावल गावचे नवनियुक्त पोलीस पाटील समीर वालावलकर व अक्षय राऊळ, यांचा निवती पोलीस स्टेशनचे अधिकारी जयेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळस्कर, देवस्थान समिती सदस्य प्रकाश चौधरी, गुरु वालावलकर, पक्की प्रभू, भालचंद्र चौधरी, यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता, लहान मुलांच्या नृत्य गायन कार्यक्रमाने करण्यात आली. याला भाविकांचा प्रचंड सहभाग लाभला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बादल चौधरी यांनी केले, यावेळी आकस्मिक मृत्यू पावलेले वालावल ग्रामपंचायत सदस्य अनंत वालावलकर यांच्या कुटुंबास रुपये 5000 ची आर्थिक मदत संस्थेतर्फे देण्यात आली.