सावंतवाडी दि.२३ एप्रिल
रेडी पोर्ट आणि मायनिंगशी नारायण राणे – निलेश राणे यांचा काय संबंध आहे ते जनतेला माहिती आहे ते आम्ही सांगण्याची गरज नाही. मात्र आमचा किँवा खासदार विनायक राऊत यांचा काहीही संबंध नाही. निलेश राणे खोटं पण रेटून बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, असे सावंतवाडी विधानसभा ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख शैलेश परब आणि राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत रेडी पोर्ट वर हप्ते आणण्यासाठी खासदार राऊत यांचे भाचे शैलेश परब, मुलगा गितेश परब, हिमांशू परब यांचा रेडी पोर्ट वरील फोटो दाखवत आरोप केला होता. त्याला पत्रकार परिषदेत उत्तर शैलेश परब,गितेश परब यांनी दिले. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, नागेंद्र परब, हिमांशू परब उपस्थित होते.
शैलेश ऊ म्हणाले, रेडी पोर्ट ,मायनिंग शी आमचा संबंध जोडणारे निलेश राणे गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत .ते अर्धवट माहितीच्या आधारे बोलत आहेत . हप्ते घ्यायला जाणारे फोटो काढत नाहीत हे त्यांनी जाणले पाहिजे.तसेच व्हिडिओ किंवा सीसीटीव्ही कॅमेरे देखील असतील त्यातून आम्ही किती वेळा रेडी पोर्ट वर गेलो हेही उघड करावेत .मात्र ते जनतेची जाणून-बुजून दिशाभूल करत आहे. आम्ही एक वेळ रेडी पोर्टवर गेलो होतो तेही भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक ठेवली होती. यावेळी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार आणि काम मिळावे म्हणून मागणी केली होती. या कारणासाठी सामंत यांच्या निर्देशानुसार आम्ही तिथे रेडी पोर्ट चे श्री पाल यांचा फोन आल्यावर गेलो होतो. त्यावेळी स्थानिकांना रोजगार मिळावा या विषयावर चर्चा झाली आणि श्री .पाल यांनीच आम्हाला रेडी बंदराचा विकास कसा होईल हे दाखविले त्यावेळी ते फोटो काढले आहेत त्या वेळी आम्ही तेथे गेलो त्यानंतर पुन्हा कधी किंवा त्यापूर्वी कधीही त्या ठिकाणी आम्ही गेलेलो नाही.
परब म्हणाले,आमच्या रेडी पोर्ट किंवा मायनिंगशी काही संबंध नाही. उलट नारायण राणे आणि निलेश राणे यांचे मायनिंग किंवा रेडी पोर्ट शी काय संबंध आहेत ते आम जनतेला माहिती आहेत. राणे यांच्याकडे केंद्रीय सूक्ष्म लघु मंत्रालय आहे त्या माध्यमातून विकास काय केला हे सांगणे त्यांना अवघड बनत आहेत म्हणून विनायक राऊत आणि आमच्यावर खोटे नाटे आरोप करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते वादळ असो, चीपी विमानतळ, मुंबई गोवा महामार्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी काम केलेले आहे. शासकीय मेडिकल कॉलेज स्वतःचे पोट भरण्यासाठी सुरू झालेले नाही हेही राणे यांनी लक्षात घ्यावे जनतेच्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ते सुरू केले आहे. राणे यांच्या बुडाखाली काय आहे ते त्यांनी पाहावे.
परब ,गितेश राऊत म्हणाले,रेडी पोर्ट वर राणे यांचा पुतण्या अक्षय राणे वरचेवर कशासाठी जातो तो मुंबईत असतो पण रेडीत त्याचा काय संबंध आहे तोतर रेडीचा भूमिपुत्र नाही.त्याची गाडी या ठिकाणी का तपासली जात नाही हे सारे प्रश्न जनतेला पडलेले आहेत त्याची उत्तरे निलेश राणे यांनी द्यावे. स्थानिक आमदार,मंत्री दीपक केसरकर, मंत्री अब्दुल सत्तार देखील रेडी पोर्टवर गेले होते त्यांच्याबाबत निलेश राणे बोलले नाहीत. नारायण राणे आणि निलेश राणे यांनी विकासावर बोलावे उगाच खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये असे आव्हान देखील शैलेश परब व गितेश राऊत यांनी दिले.
गितेश राऊत म्हणाले,त्यांनी रेडी पोर्ट आणि मायनिंगशी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे अन्यथा त्यांनी पुढील निवडणूक लढवू नये असे आवाहन देखील दिले . वनसंज्ञेच्या मुद्द्यावर आम्ही जाहीर पत्रक वाटप केलेले नाही. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. महामार्गावरील टोल नाका मिळवण्यासाठी टेंडर प्रक्रिया झाली त्यात आमचा काही संबंध नाही. केंद्रीय मंत्री गडकरी त्यांचेच आहेत तेथे त्यांनी पहावे. उगाच व्यक्तिगत टीका करू नये असे सांगताना गितेश राऊत म्हणाले, अपकी बार अडीच लाख पार विनायक राऊत म्हणतायेत भगवी मशाल ची लाट या मतदारसंघात निर्माण झाली आहे त्यामुळे विनायक राऊत तिसऱ्यांदा विजयी तर ते पराभवाची हॅट्ट्रिक साधणार आहेत असे त्यांनी सांगितले.