वैभववाडी,दि.२३ एप्रिल
उबाठा पक्षाचे माजी शहर प्रमुख विलास सरवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
विलास सरवणकर हे कोकिसरे येथील रहिवाशी आहेत. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. सहा वर्ष त्यांनी वैभववाडी शहर प्रमुख पदावर काम केले. तसेच विभाग प्रमुख पदावर ही त्यांनी काम केले होते. त्यांच्या सोबत राजेंद्र पोटफोडे, राजश्री पोटफोडे, सुरेश जठार, नितीन जठार, सुवर्णा जठार, वैभव पोटफोडे, सुलोचना जठार यांचा समावेश आहे.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, प्रकाश पाटील, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर, अवधूत नारकर, राजेश सरवणकर, सज्जन माईंणकर, उदय पांचाळ व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Home आपलं सिंधुदुर्ग वैभववाडी उबाठाचे माजी शहरप्रमुख विलास सरवणकर यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश