सावंतवाडी दि.२४ एप्रिल
मंत्रालयातील शिक्षण विभागात नव्हे तर क्रीडा विभागात चेक घोटाळा झाला आहे. त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू झाली आहे. मात्र हा प्रकार क्रीडा विभागात घडला आहे त्याबद्दल निश्चितच चौकशी होईल असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.
शिक्षण मंत्रालयात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही .क्रीडा विभागात तो प्रकार झाला आहे. मात्र त्या संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे प्रत्येक खात्याचे वेगवेगळे सचिव असतात त्यामुळे मी प्राथमिक माहिती घेतली असता क्रीडा विभागात तो प्रकार झाला आहे मात्र ज्याने हे जे काही केलं आहे त्याची चौकशी होणार असून बँक सखोल चौकशी करणार आहे आणि त्यानंतर सत्य उजेडात येणार असे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मंत्रालयात बोगस चेक द्वारे व चेकवर खोट्या सह्या करून पैसे हडप केल्याचा प्रकार झाला आहे. याबाबत बँक जबाबदार आहे. हा प्रकार शिक्षण व क्रीडा विभागात झाल्याचे चर्चा आहे याबाबत श्री केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले शिक्षण व क्रीडा विभाग हे वेगवेगळे विभाग आहेत दोन्ही विभागाचे सचिव वेगवेगळे आहेत आणि क्रीडा विभागात हा प्रकार झाला आहे असे माझ्या सचिवाने सांगितले आहे मात्र खोटे चेक आणि बनावट सह्या करून बँकेमध्ये ते चेक वटवण्यात आले आहेत मात्र सदरचे बोगस चेक कोणी बनवले हे बँक शोधून काढेल परंतु त्या अगोदर पोलीस ठाण्यात मंत्रालयामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे शिक्षण विभागात कुठलाही असा घोटाळा झालेला नाही मात्र शिक्षण व क्रीडा विभाग हे जरी एकत्र असले तरी क्रीडा विभागाचे मंत्री हे वेगळे आहेत आणि तेच त्याबाबत काय ते उत्तर देऊ शकतात मात्र असा प्रकार होणे ही गंभीर बाब आहे असे ते म्हणाले.
शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भात निर्णय झाला होता मात्र आचारसंहितेनंतर पुढील वर्षी शाळा बदलांबाबत निर्णय घेतला जाईल असेही केसरकर म्हणाले जर्मन ची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली आहे जर्मन मध्ये येथील तरुण-तरुणा नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत या नोकऱ्यांमध्ये साडेतीन लाख रुपये दर महिन्याला पगार असणार आहे त्यामुळे जर्मन भाषा येणे आवश्यक आहे आणि निश्चितपणे यातून येतील तरुण-तरुणींना एक वेगळा प्रकारचा रोजगार नोकरी उपलब्ध होणार आहे आणि हे फायद्याचे आहे असे केसरकर म्हणाले.